Sunday, May 24, 2009

Complete draft of Uddhav's open letter to Raj Thackeray

राज ठाकरे बंद करा बकवास. तुमच्या बेताल ‘पकपकी’मुळे मराठी माणसांचा तमाशा होतोय. तमाशातील बारीप्रमाणे सवालजबाब करण्याची माझी अजिबात इच्छा नसून माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे काम करणारा मी एक सच्चा मराठी शिवसैनिक आहे, अशा खणखणीत शब्दांत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना जबरदस्त टोला लगावला आहे.‘दोन मराठी माणसे भांडताहेत व महाराष्ट्राचे दुश्मन टाळ्या वाजवताहेत हे चित्र मला नको आहे. दुर्दैवाने आज तेच घडत आहे. राज ठाकरे ज्या पद्धतीची पकपक करीत आहेत, बोलत आहेत त्यामुळे त्यांचेच पितळ उघडे पडत असून, शिवसेनेच्या विचारांचे नाणे मात्र, खणखणीत वाजत आहे.राज ठाकरे यांनी त्यांच्या ‘पकपक’ भाषणात जे बकवास प्रश्न उपस्थित केलेत ते हास्यास्पद आहेत. उद्धव ठाकरे यांनी कोणाला मतदान केले? त्यांनी जेठमलानींनाच मतदान केले ना? असा सवाल आहे. होय मी मा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार महेश जेठमलानी यांनाच मतदान केले आहे. मी व माझ्याप्रमाणे असंख्य शिवसैनिक फक्त शिवसेनाप्रमुखांचेच आदेश मानतात आणि जेठमलानी यांनी मतदान केले त्याबाबत राज ठाकरे यांनी संतापाचा झटका येण्याचे कारण काय? राज ठाकरे मराठमोठय़ा रमेश किणीच्या खून प्रकरणात अडकले होते तेव्हा शिवसेनाप्रमुख स्वत: ‘राज’ यातून कसा बाहेर पडेल होऽऽ यासाठी सतत जेठमलानींच्याच संपर्कात होते. त्यामुळे युतीचे उमेदवार म्हणून किणी प्रकरणातील उपकारकर्ते म्हणून जेठमलानींना मतदान करणे हे कर्तव्यच ठरते हे आता तरी राज ठाकरे यांना पटायला हरकत नाही; पण केलेल्या उपकारांची जाण ठेवून वागतील ते राज ठाकरे कुठले?‘मनसे’च्या दळभद्रीपणामुळे संजय निरुपम निवडून आले हे खरेच आहे. निरुपम आले व राम नाईक पडल्याचा जणू आनंदोत्सवच आता सुरू आहे. या निर्लज्जपणासही दाद द्यावीच लागेल. राज ठाकरे म्हणतात, निरुपम शिवसेनेनेच मांडीवर घेतले होते ना? राजजी, बरोबर आहे तुमचे निरुपम बेइमान निघाले. खाल्ल्या मिठाला जागले नाहीत हे खरेच आहे. निरुपम मराठी माणसाच्या मुळावर येत आहे. हे ज्याक्षणी लक्षात आले त्याक्षणी शिवसेनाप्रमुखांनी त्यांच्या पाश्र्वभागावर लाथ मारून त्यांना हाकलून दिले; पण तुमचे काय? राज आपण तर जन्मत:च माँसाहेबांच्या, बाळासाहेबांच्या मांडीवरच खेळलात व मोठे झालात, माँनेच तुम्हाला मांडीवर बसवून जेवू-खावू घातले. आपल्याला आज जो मराठी कंठ फुटला तोही त्याच मांडीवर. तुमच्यासारख्यांनी जेथे माँ व बाळासाहेबांच्या मांडीवर खेळून बेइमानी केली तेथे निरुपमचे काय? ते तर परके व उपरेच होते. तुम्हाला काय कमी केले म्हणून बाळासाहेब व शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही गेलात?मुंबईतील शिवसेनेचे उमेदवार मतांच्या फाटाफुटीमुळे पडले. त्यामुळे आता दिल्लीत मराठी माणसांची बाजू कोण मांडणार? ही आमची सल आजही कायम आहे. यावर राज ठाकरे विचारतात. मग शिवसेनेचे जे ११ खासदार निवडून आले ते नेपाळी आहेत काय? ते नेपाळी नाहीत. मराठीच आहेत; पण मोहन रावले, सुरेश गंभीर, गजानन कीर्तिकरांसारखे उमेदवार मुंबईत पडले ते ‘बांगलादेशी’ होते, असे राज ठाकरे यांना म्हणायचे आहे काय? मराठी तरुणांच्या नोकऱ्या व रोजगारांसाठी ३५ वर्षे काम करणाऱ्या गजानन कीर्तिकरांचा पराभव ज्या शालिनी ठाकरेंमुळे झाला त्या शालिनीताईंचे कूळ व मूळ काय? शालिनी ठाकरे मराठी आहेत की अमराठी आहेत. असे फालतू प्रश्न विचारण्याच्या आम्ही फंदात पडलो नाही. दीपक सावंत यांना आम्ही पदवीधर मतदारसंघातून उभे केले होते; पण राज ठाकरे यांनी त्या वेळी काँग्रेसचे उमेदवार अमरजितसिंह मनहास यांना पाठिंबा दिला होता. दीपक सावंत हे मराठीच होते, ते काही नेपाळी नव्हते. शिवाय इतकी वर्षे शिवसेनेत व परिवारात राहून काकांच्या पाठीत वार करून आपण निघून गेला. पण शिवसेनाप्रमुखांची इमानेइतबारे सेवा करणारा थापा नेपाळीच आहे हे विसरू नका. आपण उत्तम नकलाकार आहात. हिंदी सिनेमांचे डायलॉगही पाठ आहेत. ‘आपुन ने सॉलिड मारा..’ हा अमिताभचा डायलॉग आपण म्हटलात. एका बाजूला अमिताभवर बंदी घालण्याची व त्याचाच डायलॉग वापरून स्वत:चीच ‘सॉलिड’ मारून घ्यायची ही ढोंगं शिवसेनेत कधी चालली नाहीत.‘‘राज ठाकरे आपली वक्तव्ये पाहून वाटते, की आपण आता खूप खपूच मोठे झाला आहात. आपले हात आभाळाला पोहोचलेत. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्रीही म्हणे आपणच ठरविणार आहात. जरूर ठरवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद हे आपल्यासाठी खूपच छोटे आहे. आपण आता इतके मोठे झाला आहात, की महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदच काय, तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष व ब्रिटनचे राजपुत्र व राजकन्या हेदेखील आपणच ठरवू शकता. आपल्याला आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्याशिवाय मी दुसरे काय करू शकतो?आतापर्यंत राज ठाकरेंच्या बेताल टीकेकडे व आरोपांकडे मी लक्ष दिले नाही. कारण माझ्यावर ‘माँ व बाळासाहेबांचे संस्कार आहेत; पण आता राज माझे नाव घेऊन बोलला म्हणूनच हा खुलासा करीत आहे. यापुढे मला राजच्या टीकेला उत्तर देण्याची गरज नाही. राज, ही बकवास आतातरी थांबवा. एवढेच मी नम्रपणे सांगू इच्छितो!

2 comments:

Anonymous said...

UT mhantil te khare asel.. mhanje te evdhya mothya vayaatpan Balasaheb sangtat tyanna vote kartat.swatala ajun kalat nahi konala votingkarava. tyasathipan balasaheb lagtat.lolo

Anonymous said...

heheehe :)

LinkWithin

Blog Widget by LinkWithin